नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने एका अल्पवयीन बालकाकडून दीड लाख रुपये किंमतीच्या 6 दुचाकी गाड्या आणि दोन मोबाईल फोन असा जवळपास 2 लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे. या संदर्भात परभणी, नांदेड, सोनखेड, उस्माननगर येथे त्या संदर्भाचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, संग्राम केंद्रे, शंकर मैसनवाड, संजय केंद्रे, देवा चव्हाण, रवि बाबर, हेमंत बिचकेवार यांनी 22 मे रोजी मंगल सांगवी ता.कंधार येथील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेवून विचारपुस केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किंमतीच्या 6 दुचाकी गाड्या आणि दोन मोबाईल असा एकूण 2 लाख रुपये किंमतीचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या बालकाला उस्माननगर येथील चोरीच्या गुन्ह्यात पुढील तपासासाठी त्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात सोनखेड, नांदेड ग्रामीण, परभणी जिल्ह्यातील नानलपेठ आणि परभणी ग्रामीण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरलेल्या आहेत.
स्थागुशाने विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून 2 लाखांचा चोरीचा ऐवज जप्त केला