नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या लेकरांना ऍनरॉईड मोबाईल देवून पालक खूश होतात. पण त्याचा परिणाम कधी-कधी भरपूर वाईट होतो. याचा अनुभव कांही दिवसानंतर येतो. असाच एक प्रकार नांदेडमध्ये अभ्यास करणाऱ्या एका बालिकेला आला आहे. तिला त्रास देणाऱ्या 21 वर्षीय युवकाविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील दूरवरच्या एका जिल्ह्यात राहणारी एक बालिका नांदेडमध्ये शिक्षणासाठी आली. येथे येण्यापुर्वी ही अल्पवयीन बालिका असतांना लोहारा जि.जळगाव येथे आपल्या एका नातलगाकडे गेली होती. तेथे तिची ओळख धिरज कैलास चौधरी या 21 वर्षीय युवकासोबत झाली. झालेली ओळख हळुहळू फोनवर बोलण्यात बदली. त्यानंतर हे बोलणे व्हिडीओ कॉलमध्ये बदलले. त्यानंतर व्हिडीओ कॉलचा दुरउपयोग झाला आणि धीरज चौधरीने काढलेले न पाहण्यासारखे स्क्रिन शॉट बाबत तो युवतीची ब्लॅकमेलिंग करू लागला. युवती नांदेडमध्ये शिक्षणासाठी आल्यावर धीरज चौधरी नांदेडला आला. बालिकेने सुध्दा आपल्या मोबाईलमध्ये कांही स्क्रीन शॉट केले त्या बालिका एका हॉटेलमध्ये नेऊन धीरज चौधरीने तिच्या मोबाईलमधील स्क्रिन शॉर्ट धमक्या देवून बळजबरीने डिलिट केले. त्या ठिकाणी तिला मारहाण पण केली. आपल्या सोब\च घडलेला प्रकार सहनशिलतेच्या बाहेर गेल्यावर त्या बालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 180/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 354(ड), 323, 504, 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्या तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक भारती वाठोरे या करीत आहेत.