नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने सन 2022 या वर्षातील बदल्या बदली अधिनियमानुसार वेळेत कराव्यात असे शासन पत्र जारी केले आहे. या शासन पत्रावर अवर सचिव बाबासाहेब विरोळे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
सन 2022 या सुरू असलेल्या वर्षात बदली अधिनियमानुसार बदलीची कार्यवाही करण्यात यावी किंवा कसे या बाबत विविध प्रशासकीय विभागांकडून विचारणा करण्यात येत असल्याने त्यासाठी शासनाने स्पष्टीकरण जारी केले आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सन 2005 पासून प्रतिवर्षी बदली करण्यास सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रशासकीय विभागाच्या स्तरावरून एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातात.
कोविड-19 या विष्णूमुळे तयार झालेल्या महामारी परिस्थितीमुळे सन 2020 आणि 21 या दोन वर्षाच्या एप्रिल आणि मे महिन्यात बदल्या न करण्याचे स्वतंत्र आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्ममित करण्यात आले होते. पण आता बदलीच्या अधिनियमानुसार यंदाच्या बदल्या कराव्यात असे हे शासकीय पत्र दि.23 मे 2022 रोजी जारी करण्यात आले आहे. शासनाचे हे पत्र संकेतांक क्रमांक 202205231745453607 नुसर शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
यंदाच्या बदल्या अधिनियमानुसार करा-शासनाचे आदेश