30 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून खून

नांदेड(प्रतिनिधी)-बेटमोगरा येथून आपल्या आईच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेचा मृतदेह 15 मे रोजी सापडला. आता या संदर्भाने त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिचा खून केल्याचा गुन्हा मुक्रामाबाद पोलीसांनी दाखल केला आहे.
चंदरबाई रावसाहेब भद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 मे रोजी सकाळी 9 वाजता इंदरबाई उर्फ प्रेमला बापूराव भेंडेगावकर (30)ही महिला आपल्या आईच्या घरी देगलूर येथे जावून येते असे सांगून निघाली. तिचे प्रेत 15 मे रोजी सकाळी सावरमाळ शिवरात शेत गट क्रमांक 254 मधील आखाड्यासमोर सापडले. त्या दिवशी आकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आता प्रेमला बापूराव भेंडेगावकर (30) या महिलेचा अज्ञात माणसांनी अज्ञात कारणासाठी तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक कांगणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *