नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली ते बाभुळगाव रस्त्यावरदुचाकी थांबवून 37 हजार रुपयांच्या ऐवजाची लुट झाली आहे. भोकर येथे घरफोडून चोरट्यांनी 96 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरला आहे. आठवडी बाजार कंधार येथे आणि नांदेड शहरातील एका परमिट रुममधून एक असे 25 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरीला गेले आहेत.
दत्तात्रय मारोती चंदनकर हे 22 मे रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान त्यांचे मुळ गाव हज्जापूर येथून दुचाकी गाडीवर बसून बिलोलीकडे येत असतांना बाभुळगाव जाणाऱ्या रस्त्यावर दोन जणांनी हात दाखवून त्याला दुचाकी थांबविण्यास सांगितले. दुचाकी थांबताच ते दोघे गाडीवर बसून त्यास पुढे घेवून गेले. आणि त्याला मारहाण करून दुचाकी क्रमांक एम.एच.26 7935 किंमत 30 हजार रुपये, रोख रक्कम 4 हजार रुपये आणि मोबाईल 3 हजार रुपये असा 37 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 116/2022 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे अधिक तपास करीत आहेत.
गजानन शशिकांत विजापुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 मे 2022 ते 22 मे 2022 या दरम्यान डौर ता.भोकर येथील त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कडीकोंडा तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिणे आणि साड्या असा 96 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंंमलदार कदम हे करीत आहेत.
कंधार शहराच्या आठवडी बाजारातून चंद्रकांत शिवाजी केंद्रे यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल 23 मे रोजी दुपारी 3 वाजता चोरीला गेला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. नांदेड शहराच्या जुना मोंढा भागातील नवजीवन परमिट रुम आणि बार येथील रमेश किंमतराय निहलानी यांच्या काऊंटरवर ठेवलेला 10 हजार रुपयंाचा मोबाईल 23 मे रोजी 11.30 वाजता चोरीला गेला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक मठपती अधिक तपास करीत आहेत.
दुचाकी थांबवून मारहाण जबरी चोरी, घरफोडले, दोन मोबाईल चोरी