भोकर तालुक्यात जबरी चोरी, शहरातील बसस्थानकात चोरी, इतवारा हद्दीत चोरीचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-25 मे रोजी बोरगाव ता.भोकर येथे कांही घरांवर दगडफेक करून 1 लाख 75 हजार रुपयांची जबरी चोरी झाली आहे. वजिराबाद भागातील बसस्थानकात माहुर बसमध्ये प्रवेश करतांना तीन अनोळखी महिलांनी एका महिलेचे 1 लाख 2 हजार 727 रुपयांचे दागिणे लांबवले आहेत. विणकर कॉलनीमध्ये एका पतसंस्थेचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. ही पतसंस्था नगरसेवक नागेश कोकुलवार यांची आहे.
दत्ता होनाजी याटेवाड रा.बोरगाव ता.भोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 मे च्या मध्यरात्री 12 वाजता त्यांना त्यांच्या पत्नीला गावातील शोभाबाई हुबेवाड आणि देवराव पवार यांना दगडफेक करून जखमी करण्यात आले आणि त्यांच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिणे 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत कांबळे अधिक तपास करीत आहेत.
प्रभातनगर नांदेड येथील महिला राणी महेंद्र भगत यांना 24 मे रोजी आर्णी जि.यवतमाळ येथे लग्नाला जायचे होते. ते आणि त्यांचे वडील सायंकाळी 4.30 ते 4.40 या वेळेदरम्यान माहूर या एस.टी.गाडीत प्रवेश करत असतांना 3 अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या गळ्यात असलेल्या बॅगची चेन काढून त्यातील 1 लाख 2 हजार 727 रुपयांचे सोन्याचे गंठण चोरले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अनिल झांबरे अधिक तपास करीत आहेत.
नगरसेवक नागेश गोविंद कोकुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरीओम नागरी पतसंस्था विणकर कॉलनी नांदेड येथे 25 मे च्या रात्री 2.30 ते 4 या वेळेदरम्यान त्यांची पतसंस्थेत चॅनेलगेट चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी तरी तोडले आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक महेमुद बेग अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *