कंधारेवाडी येथे तीन घर फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कंधारेवाडी ता.कंधार येथे तीन घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.मौजे आदमपूर ता.बिलोली येथून एका हॉटेल व्यवसायीकाचा मोबाईल चोरीला गेला आहे. किनवट आणि मुखेड येथून 50 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
मौजे कंधारवाडी ता.कंधार येथील वच्छलाबाई तुळशीराम पल्लेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 मे च्या रात्री 10 ते 27 मे च्या पहाटे 4 वाजेदरम्यान गावातील त्यांची घर, निवृत्ती नामदेव कंधारे यांचे घर आणि काशिनाथ मारोती मोरे यांचे घर असे तीन घर चोरट्यांनी फोडले. त्यातून पल्लेवाड यांच्या घरातून 90 हजार, निवृत्ती कंधारे यांच्या घरातील 10 हजार रुपये रोख रक्कम आणि काशीनाथ मोरे यांच्या घरातील 30 हजार रुपयांचा असा एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक इंद्राळे अधिक तपास करीत आहेत.
आदमपूर ता.बिलोली येथे टीन पत्राची हॉटेल असेलेले शिवचरण संजय हलवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 मेच्या रात्री 10 वाजता ते झोपले आणि 26 मेच्या रात्री 1 वाजता त्यांना जाग आली तेंव्हा आपल्या उशीजवळ ठेवलेला त्यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला होता. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक इंगळे अधिक तपास करीत आहेत.
रवि आत्माराम जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 मेच्या दुपारी 11.30 ते 2 या वेळेदरम्यान कलावती गार्डन कंपाऊंड माहुर रोड किनवट येथून त्यांची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.29 झेड 3146 चोरीला गेली आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
शंकर गोविंदराव गोरे यंाची 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एन.7631 ही 23 मे च्या रात्री 10 ते 24 मेच्या पहाटे 6 वाजेदरम्यान मुखेड येथील त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भारती हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *