नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फक्त 10 लाख रुपये किंमतीचा एक हायवा टिपर चोरीला गेल्याचा प्रकार 8 दिवसानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे.
शिवशंकर सिताराम पचलिंगे रा.इंजेगाव ता.जि.नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता त्यांनी आपला हायवा टिपर क्रमांक एम.एच.26 बी.ई.7622 हा शिवशंकर पेट्रोलियम वाजेगाव वळण रस्ता येथे उभा केला होता. 20 मेच्या सकाळी 7.30 वाजता पाहिले असता तो टिपर चोरीला गेला होता. नांदेड ग्रामीण पोलीसांकडे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठव्या दिवशी या टिपर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून फक्त 10 लाखाच्या टिपरची चोरी