नांदेड(प्रतिनिधी)-माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात गोंधळ घालणाऱ्या दुसऱ्या गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलीसांनी सायंकाळी 7 वाजता पकडले आहे. डी.पी.सावंत यांच्या घरात गोंधळ घालण्याचा कट पिवळीगिरणी परिसरात शिजला होता.
सायंकाळी 4 वाजता माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून तेथील सुभाष पवार यांना मारहाण करतांना हल्लेखोरांनी खेळणीची बंदुक वापरली होती. पोलीसांनी त्यावेळी त्वरीत प्रभावाने घटनास्थळ गाठून साहिल विनोद माने यास अटक केली होती.
घटनाघडल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांसह पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी तेथे पोहचले होते. घडलेल्या प्रकाराला शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत गांभीर्याने घेतले आणि या बाबतचा पुढील शोध घेण्यास सुरूवात केली. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे आणि अनेक पोलीस अंमलदारांनी या घटनेचा कट शोधला तेंव्हा हा कट पिवळी गिरणी परिसरात शिजला तेंव्हा साहिल विनोद माने सह हर्षवर्धन अरविंद कांबळे (19) हा पण असल्याचे सिध्द झाले. शिवाजीनगर पोलीसांनी हर्षवर्धन कांबळेला सुध्दा ताब्यात घेतले आहे.
वृत्तलिहित असतांना माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात काम करणारे सुभाष चांदोजी पवार यांची तक्रार लिहुन घेतली जात होती. त्यानंतर अटक केलेले दोघांविरुध्द कायदेशीर कार्यवाही असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरात गोंधळ घालण्याचा कट पिवळीगिरणी परिसरात शिजला होता;दोन जण अटकेत