नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत दमदार पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण यांनी आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ईतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमेर फंक्शन हॉलजवळ विक्री होत असलेला प्रतिबंधीत गुटखा पकडला आहे. तेथे पकडलेल्या साहित्याची एकूण किंमत 1 लाख 97 हजार 163 रुपये आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांच्या विभागातील दमदार पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण आणि कांही पोलीस अंमलदारांना गस्तीवर पाठवले. परमेश्र्वर चव्हाण यांच्या सोबत या पथकात अत्यंत कर्तदव्य पोलीस अंमलदार संजय केंद्रे, सखाराम नवघरे, शंकर मैसनवाड, गजानन बैनवाड आणि शेख कलीम हे होते. त्यांना गस्त करतांना अत्यंत गुप्त आणि जबरदस्त माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आमेर फंक्शन हॉलजवळ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री होत होता असे त्यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे. 31 मे च्या दुपारी 12.30 वाजता त्यांनी त्या दुकानात छापा मारला. तेथे मोहम्मद मोहसीन उर्फ अफशान सौदागर अब्दुल सलीम सौदागर (29) हा व्यक्ती होता. या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा साठवलेला होता. तो विक्री आणि वितरण आणि वाहतुक करण्यास प्रतिबंध असतांना तो गुटखा या दुकानात आला होता. या ठिकाणी पोलीस पथकाने वेगवेगळ्या कंपनीचे अनेक गुटखे जप्त केले, कांही सिगारेट पॉकीट सुध्दा जप्त केले. या सर्व ऐवजाची किंमत 1 लाख 97 हजार 163 रुपये आहे. या सर्व ऐवजाचा पंचनामा करून जप्तती पंचनामा, सी.ए.सॅम्पल पॉकीट जप्त केलेला सर्व मुद्देमाल आणि एक आरोपी मोहम्मद मोहसीन उर्फ अफशान अब्दुल सलीम सौदागर अशा सर्व साहित्यासह तक्रार ईतवारा पोलीस ठाण्यात दिली आहे. या बाबत ईतवारा पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा आधीनियमनुसार मोहम्मद मोहसीन उर्फ अफशान सलीम सौदागर विरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू झाला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण हे स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असल्याने त्यांना मिळणारी माहिती आणि त्यावर होणारी कार्यवाही जबरदस्तच असते. नांदेड जिल्ह्यात कोठेही कार्यवाही करण्याचा अधिकार परमेश्र्वर चव्हाण यांना आहे. सोबतच गुटखा विक्री फक्त नांदेडमध्येच होते काय? आणि देगलूर नाका आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगाव ही केंद्रे तर गुटख्याच्या व्यवसायासाठी सुप्रसिध्दच आहेत. मोहसीन सौदागरवर प्रतिबंधीत गुटखा विक्रीची कार्यवाही स्वागतार्हच आहे. पण इतर गुटखा विक्रेत्यांवर परमेश्र्वर ठाणूसिंग चव्हाण हे दमदार पोलीस उपनिरिक्षक कधी कार्यवाही करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.