नांदेड जिल्ह्यातील पोलीस अंमलदाराच्या डॉक्टर मुलाचा मृत्यूदेह औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादजवळ झाडाला लटकलेला सापडला

नांदेड(प्रतिनिधी)-येथील पोलीस अंमलदाराच्या एकुलत्या एक डॉक्टर पुत्राचा मृतदेह औरंगाबाद जवळच्या दौलताबाद परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलीस ठाण्यात नरेंद्र तिडके हे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा योगेश तिडके (25) हा वैद्यकीय क्षेत्रातील दंत चिकित्सा शिक्षण औरंगाबाद येथे घेत होता. 29 मे रोजी तो नांदेड येथून आई-वडीलांना भेटल्यानंतर रेल्वेने औरंगाबादकडे रवाना झाला. पण तो औरंगाबादला पोहचला नाही. त्यानंतर त्याची शोधा-शोध सुरू झाली तेंव्हा दौलताबाद जि.औरंगाबाद शिवारात एका झाडाला दौरीने गळफास घेवून असलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेहच सापडला.या संदर्भाने कायदेशीर प्रक्रिया औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहे. योगेश हा पोलीस अंमलदार नरेंद्र तिडके यांचा एकुलता एक पुत्र होता आणि तो अद्याप वैद्यकीय विभागात पदवीचे शिक्षण घेत होता. पोलीस विभागातील अंमलदारांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत असतांना अशा अवस्थेत त्याचा मृतदेह सापडणे अगदी मनाला चटका लावून जाणारी बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *