नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय आईने मी माता नसून वैरीणी आहे हे सिध्द करत आपल्या दोन वर्षीय बालकाचा आणि चार महिन्याच्या बालिकेचा जीव घेऊन आपल्या आई आणि भावासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या तिनही गुुन्हेगारांना भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोविंद दगडूजी निमलवार (85) रा.पांडूर्णा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 मेच्या रात्री 8 ते 1 जून च्या सायंकाळी 6 वाजेदरम्यान पांडूर्णा शिवारात धुरपदाबाई गणपत निमलवाड (30) हिने आपले दोन निरागस बालक आणि बालिका ज्यांची नावे दत्ता गणपत निमलवाड(2), अनुसया गणपत निमलवाड (4 महिने) या दोघांना मारुन टाकून त्यांची प्रेते तिची आई कोंडाबाई आणि भाऊ माधव यांच्या मदतीने जाळून ती नष्ट केली. याबाबत भोकर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 195/2022 कलम 302, 201 आणि 34 भारतीय दंड संहितेनुसार दाख लकेला आहे.
भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन निरागसांची हत्या करणारी त्यांची आई धुरपदाबाई गणपत निमलवाड(30), तिची आई कोंडाबाई पांडरूंग राजेमोड, माधव पांडूरंग राजेमोड दोघे रा.ब्राम्हणवाडा यांना ताब्या घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील हे करीत आहेत.
जन्म देऊन आईनेच आपल्या दोन बालकांची हत्या केली