अर्धापूर(प्रतिनिधी)-शहरातील गवळी गल्ली येथील दिपक फलाजी विरकर वय 40 वर्षे यांचे दि.1 जुन बुधवार रोजी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दि.2 जुन गुरुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अर्धापूर येथे होणार आहे. अर्धापूर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून अनेक दैनिकांचे अविरतपणे वितरण करणारे व अर्धापुर शा. गोदावरी अर्बन बॅंकेचे बचत ठेव प्रतिनिधी अत्यंत कष्टाळू व मेहनती वृत्ती असलेले दीपक विरकर यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे. ते वृत्तपत्र विक्रेते रमेश विरकर व पत्रकार गुणवंत विरकर यांचे चुलत बंधू होत.
Related Posts
बालविवाह निर्मूलनासाठी गावोगावी लोकचळवळ निर्माण व्हावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका)- बालविवाह ही गंभीर समस्या असून त्याचे समूळ उच्चाटन करणे हे सर्वाचे कर्तव्य आहे. हा अतिसंवेदनशील प्रश्न असून या…
ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर येथील उपसरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले
नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर ता.मुदखेड येथील उपसरपंच आणि एका ग्राम पंचायत सदस्याला गायरान जमीनीवर अतिक्रमण केले म्हणून त्यांना पुढील कालावधीसाठी…
चिखलीकरांच्या व्यवस्थापकाचे मारेकरी स्वतः हजर झालेत;अद्याप अटक मात्र नाही
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतः हजर आलेल्या खूनप्रकरणातील चार आरोपीना आज वृत्त लिही पर्यंत तरी अटक दाखवण्यात आलेली नाही.…