नांदेड(प्रतिनिधी)-यशश्रीनगर वाडी (बु) येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 19 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अरविंदनगर जवळ एक घरफोडून चोरट्यांनी 32 हजार 600 रुपयांची चोरी केली आहे.
हनमंत माधवराव नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे 2022 रोजी सायंकाळी 4 ते 1 जून 2022 च्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान त्यांचे कुटूंब जालना जिल्ह्यातील गुजरी या मुळगावी गेले असतांना त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम 30 हजार आणि सोन्या-चांदीचे दागिणे 89 हजार 600 रुपयांचे असा 1 लाख 19 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
अंकीत ओमप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर अरविंदनगर जवळ आहे. दि.29 मे च्या सायंकाळी 7 ते 30 मेच्या सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान त्यांचे घर संमत्तीशिवाय कोणी तरी कुलूप तोडून प्रवेश मिळवला. घरातील एलसीडी टी.व्ही. चॉंदीचे प्लेट, वाटी, ग्लास, देवाच्या मुर्ती आणि घराच्या रजिस्ट्रीचे मुळ कागदपत्र असा 30 हजार 600चा ऐवज चोरून नेला. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शेख अधिक तपास करीत आहेत.
वाडी (बु) आणि शिवाजीनगर येथे घर फोडले