नांदेड,(प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समर्थ रामदासांचे जन्मगाव असलेल्या जांब(समर्थ) ता. घनसांगवी जि. जालना येथे श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे. गंगा दशहरा या पावन पर्वानिमित्त दिनांक 4 जून 22 ते 12 जून 22 या कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या या उत्सवात नामवंत किर्तनकार,प्रवचनकार व गायक यांचा सहभाग राहणार आहे. तसेच ग्रंथराज श्रीमत् दासबोध या ग्रंथाचे पारायण होणार आहे.तसेच दासबोध अभ्यास वर्ग व श्री समर्थ संप्रदाय उपासना इ कार्यक्रमाचा समावेश असेल.2003 पासून सतत संपन्न होणाऱ्या या उत्सवात अनेक समर्थ वाढता सहभाग लक्षणीय आहे. मागील 20 वर्षांपासून यशस्वीपणे आयोजन होत असल्याबद्दल आयोजक गिरीश वसंतराव सातोनकर,संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी आनंद व्यक्त केला. दोन वर्षापासून कोविड च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष स्वरूपात सहभाग न नोंदविता न आल्यामुळे यावर्षी उपस्थिती लक्षणीय राहण्याची शक्यता आहे. तरी भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक,तबलावादक, तालदास गिरीश सातोनकर यांनी सर्वांना केले आहे.
Related Posts
तहसील कार्यालयात 5 हजारांची लाच घेणारा महसुल सहाय्यक गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी निघालेली नोटीस रद्द करणे आणि मदत करण्यासाठी वर्ग-3 चे महसुल सहाय्यक यांनी 5 हजार रुपयांची लाच नांदेड तहसील…
स्थागुशाचे पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडेंची उत्कृष्ट कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)-25 ऑगस्टच्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पोलीस ठाणे इतवाराच्या हद्दीत झालेला एक चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. दि.25 ऑगस्ट रोजी…
तलाठ्याने मागितली २५ हजार रुपये लाच, १५ हजार पुर्वीच स्विकारले, आज ७ हजारांची लाच स्विकारणारा कोतवाल एसीबीच्या ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सज्जा मार्तंड ता.जि.नांदेड येथील तलाठी आणि सज्जा विष्णूपूरी येथील कोतवालने आज ७ हजार रुपये लाच स्विकारली…