जिप मध्ये वाढीव गट आणि गणांमध्ये ८ जून पर्यंत आक्षेप घेण्यास संधी

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन  यांच्या आदेशानुसार नव्या गटांची निर्मिती करण्याचे अध्यादेश जारी करण्यात आले त्यात आठ जिल्हा परिषद गट वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीचे ६३ असलेले गट आता ७३ झाले असून, आणि पूर्वीचे १२६ असलेले गण १४६ झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जि.प.गट आणि पंचायत समिती गणाच्या निर्मितीची अधिसूचना जारी केली आहे. याबद्दलच्या हरकती आणि ८ जूनपर्यंत मागविल्या आहेत. पूर्वीच्या ६५ गणा व्यतिरिक्त आता माहूर तालुक्यातील लखमापूर, किनवट तालुक्यातील मोहपूर, हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी, हदगाव तालुक्यातील कोळी, अर्धापूर तालुक्यातील लहान, नांदेड तालुक्यातील धनेगाव, मुदखेड तालुक्यातील माळकौठा, नायगाव तालुक्यातील देगाव, वंâधार तालुक्यातील गौळ, मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत असे दहा गट वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या ६३ गटात आता १० ची वाढ झाली असून, ७३ जिल्हा परिषद गटात निवडणूक घेतली जाणार आहे. तर यापूर्वी बिलोली, देगलूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव, मुखेड, वंâधार, नायगाव, मुदखेड, अर्धापूर, माहूर, धर्माबाद, भोकर, नांदेड, उमरी, लोहा या पंचायत समिती गणात यापूर्वी एवूâण १२६ गण होते ते आता जि.प.गट वाढल्यामुळे १४६ झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकांसाठी वाढलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची माहिती त्या त्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आली असून, यासंदर्भात काही आक्षेप असल्यास ८ जून २०२२ पर्यंत याबाबत आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. त्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *