पाच लाख रुपयांसाठी अंपग व्यक्तीला कपडे काढून इन्काऊंटर करण्याच्या धमकीसाठी एसीबीकडे श्री.अशोकरावजी घोरबांड यांच्याविरुध्द अर्ज

नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्येक्षात 90 टक्के अपंग असलेल्या एका व्यक्तीला इन्काऊंटर फेम पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी अंगावरील कपडे काढून इन्काऊंटर करतो अशी दुसरी धमकी याच महिन्यात दिली आहे. धमकी प्राप्त व्यक्तीने घोरबांड साहेबांनी 5 लाख रुपये मागितल्याची तक्रार पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे केली आहे. आता श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांचा चेंडू लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नुतन पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्या कोर्टात आहे.
नांदेड शहरातील बडपूरा भागात राहणारे विजयसिंघ सर्दूलसिंघ फौजी यांनी दिलेल्या तक्रारीत पहिल्याच वाक्यात मी कंबरेखालून खालच्या भागात 90 टक्के अपंग माणुस आहे. माझे शेत मौजे कौठा नांदेड येथे गट क्रमांक 50 मध्ये 2 एकर 4 गुंठे आहे. सदरील जमीनीबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. दि.6 मे 2022 रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येथील रिजवाणी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सध्या मी या जमीनीचा ताबेदार आहे.
मला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब वारंवार बोलवत आहेत. माझ्या वडीलांना नोटीसची धमकी देत आहेत. सोबतच 5 लाख रुपये पैशांची मागणी करत आहेत. सदरील रक्कम देण्याची माझी ऐपत नाही. तरीपण पोलीस निरिक्षक साहेब आणि त्यांचे साथीदार मला वारंवार नोटीस देवून तुझी कोर्ट केस खराब करतो, तुझ्या विरुध्द निकाल लावतो असे म्हणून धमकावत आहेत. त्यांच्या एका साथीदाराने मला 11 मे 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता मोबाईल क्रमांक 8468802677 या मोबाईलवरून मला पैशाची मागणी तसेच धमकी सुध्दा दिली आहे. त्या कॉलची रेकॉर्डींग सुध्दा माझ्याकडे आहे. तसेच पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब हे मला पोलीस ठाण्यात म्हणाले की, मी अंगावरील कपडे काढून इन्काऊंटर करतो या झंझटीत पडू नको मला पैसे आणून दे असे म्हणून माझे वयोवृध्द वडील आणि ज्येष्ठ नागरीक यांना धमक्या देत आहेत.
या अर्जा लिहित्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नुतन पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्याकडे याचना केली आहे की, श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. या अर्जासोबत दि.20 मे आणि 26 मे या दोन दिवशी मनपा आयुक्तांना दिलेले दोन पत्र तसेच 26 मे रोजी पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिलेले पत्र, न्यायालयाचा आदेश आणि स्वत: 90 टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *