अनिता संजय बियाणीच्या बाऊंन्सर्सनी केली मारहाण

नांदेड,(प्रतिनिधी)-संजय बियाणीच्या हत्येनंतर अनिता संजय बियाणी सोबतच्या बाऊन्सर्सनी मला मारहाण केल्याची तक्रार दवाखान्यात उपचार घेतांना संजय बियाणीचे बंधू प्रविण बालाप्रसाद बियाणी यांनी दिली आहे. याअगोदर अनिता बियाणीच्या तक्रारीवरुन संजय बियाणी विरुध्द तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दालख झालेला आहे.
5 जून रोजी विमानतळ पोलीसांसमक्ष दिलेल्या जबाबात माजी नरगसेवक प्रविण बियाणी यांनी सांगितले आहे की, ते सध्या स्वामी विवेकानंद हॉस्पीटलच्या वार्ड क्रमांक 4 मध्ये उपचार घेत आहेत. माझा भाऊ संजय बियाणी यांच्यासोबत माझी फायनान्समध्ये भागीदारी होती. पण मी ती भागीदारी 31 मार्च 2022 रोजी संपुष्टात आणली आणि पाचव्या दिवशी म्हणजे 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांची हत्या झाली. त्यानंतर 5 जून 2022 रोजी सायंकाळी 5 ते 5.30 च्या सुमारास मी आनंद नगर चौकाजवळ, राज मॉल समोर सिगारेट पित थांबलो असतांना एका पांढऱ्या गाडीतून माझी वहिणी अनिता संजय बियाणी तेथे पोहचल्या. त्या गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांच्यासोबत दोन बाऊन्सर उतरले. त्यांनी मला खाली पाडले, थापड बुक्यांनी मारहाण केली. मी विरोध केला असता माझ्या अंगावरील शर्ट आणि बिनियान पण फाडले. या गोंधळाने मी गांगरलो आणि घरी गेलो. तेथून मला राहुल मुंडे यांनी दवाखान्यातून आणून उपचार दिले. सध्या माझ्यावर औषधोउपचार सुरू असून माझी प्रकृती छान आहे. 5 जून रोजी व्यवहाराच्या वादावरून माझी वहिनी अनिता बियाणी आणि त्यांच्या सोबतच्या दोन बाऊंन्सर्सने मला थापडबुक्यांनी मारहाण करून धमकी दिली आहे. तरी अनिता बियाणी आणि त्यांच्यासह दोन बाऊन्सर्सवर कायदेशीर कार्यवाही करावी.
आजच 6 जून रोजी विमानतळ पोलीसांनी अनिता बियाणी यांच्या तक्रारीवरुन प्रविण बियाणी विरुध्द गुन्हा क्रमांक 195/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 380 आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 43 व 66 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. प्रविण बियाणीच्या जबाबावरून त्या जबाबात अ दखल पात्र गुन्हा क्रमांक 353/2022 कलम  323,504,506,34  प्रमाणे दाखल केला आहे. संपत्तीचा वाद हा आजचा नाही हजारो वर्षापासून संपत्तीचा वाद सुरूच आहे आणि आजही तो चालू आहे. जास्त संपत्ती असणे म्हणजेच त्यातून सुख मिळते हे म्हणणे आता चूक वाटू लागले आहे.
संबधीत बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *