मनपाची पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथक कार्यालयाशेजारी गट क्रमांक १५ मध्ये मनपाच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे.जनतेला पाण्याचा वापर काटकसरीने करा असे उपदेश देणाऱ्या महानगरपालिकेने मागील तीन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाहून जात असतांना त्याची जबाबदारी कोणावर निश्चित होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

नांदेड शहरातील कौठा भागात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक कार्यालय महसुली भाषेत गट क्रमांक १५ मध्ये स्थित आहे.त्या कार्यालयाच्या शेजारी महानगर पालिका नांदेडची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन आहे.त्यातून अनेकांना पिण्यासाठी पाणी पुरवले जाते.आज तिसरा दिवस उजाडला आहे.मागील तीन दिवसांपासून हि पाईप लाईन फुटलेली आहे.त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे.पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही.जनतेला पाण्याचा वापर काट केसरीने करा असा संदेश देणाऱ्या मनपाला हि पाण्याची नासाडी का दिसली नाही.किंबहुना जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.सहा एक शोध विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *