
नांदेड(प्रतिनिधी)-हर्षनगर येथे तिघांनी एका बालकाला मारहाण करून त्यांच्याकडून ऐवजाची लुट केली. पण आपलीच दुचाकी सोडून पळून गेले. या तिघांना विमानतळ पोलीसांनी त्वरीतच जेरबंद केल्यानंतर दरोड्यातील सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे न्यायालयाने या दरोडेखोरांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.11 जून रोजी मंदार माने या युवकाला शामनगर दवाखान्याजवळील हर्षनगर चौकात थांबवून त्याला तिघांनी मारहाण करून आणि धाक दाखवून त्याच्याजवळील एअरफोन आणि 900 रुपये रोख रक्कम लुटली. लुट करून पळून जातांना दरोडेखोरांनी आपली दुचाकी मात्र तेथेच सोडली. याबाबत दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 199/2022 मध्ये पोलीस उपनिरिक्षक बुरकुले यांनी पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस अंमलदार राठोड , बंडू कलंदर, गायकवाड, अरसुळे, नागरगोजे आणि भिसे यांच्या मदतीने शहरातील गंगाचाळ भागात राहणाऱ्या सुरज कोकरे, शुभम कोसरे, अश्र्वेस लोणे, या तिघांना घटनेला 24 तास होण्याअगोदरच गजाआड केले. त्यांच्याकडून 3 हजार रुपये किंमतीचा एअरफोन आणि 480 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. विमानतळ पोलीसांनी या गुन्ह्यात वापरलेली गाडी क्रमांक एम.एच.26 एल.9294 ही सुध्दा जप्त केली आहे. आज दि.12 जून रोजी न्यायालयाने या तिन दरोडेखोरांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.