स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयवर एसीबीने केलेली सापळा कार्यवाही शंकेची ?

नांदेड(प्रतिनिधी) नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला दहा हजारांची लाच घेतांना जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष ताब्यात घेतल्याची माहिती प्रसार माध्यमांना पाठवली. सार्वजनिक ठिकाणी झालेला हा सापळा प्रकार अनेकांनी पाहिला. अनेकांनी त्या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ पाहिल्यावर एसीबीच्या कार्यवाहीवर शंका घेण्यास कारण आहे असे लिहिले तर चुक ठरणार नाही.

संबंधित बातमीचा व्हिडिओ….

आज सायंकाळी ६ वाजेच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भानुदास शिवलिंगअप्पा वडजे यांनी एका वाळु माफियाकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वडजेला पकडले. घडलेला प्रकार हा सार्वजनिक ठिकाणी झाला. वडजेनेही आपल्याला पकडल्याचा खुप विरोध केला. पण एसीबीच्या चार ते पाच लोकांनी त्यांना पकडले होते. त्यातील एक वडजेच्या पाठीमागे होता. आणि एक उजव्या हाताजवळ उजव्या हाताजवळच्या हाप शर्ट परिधान केलेला एसीबीचा माणूस आपल्या पॅन्टच्या डाव्या खिशातून कांही तरी काढून भानुदास वडजेच्या पॅन्टमध्ये उजव्या बाजूला मागच्या खिशात काही तरी दडवले असे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वडजेच्या पाठीमागे उभा राहिलेला व्यक्ती हॉप शर्टवाल्याला पाहुन हसत आहे. यावरून आपली कार्यवाही फत्ते झाली असेच ते दोघे एक दुसर्‍याला सुचवत असल्याचे दिसते.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्यावतीने प्रसार माध्यमांना पाठविलेल्या माहितीत भानुदास वडजे यांनी वाळू माफियाकडून तीन टीप्पर चालविण्यासाठी प्रत्येकी सहा हजार प्रमाणे १२ हजार रुपये मागितले. तडजोडीनंतर ते दहा हजार रुपये ठरले असे लिहिले आहे. सोबतच वडजेच्या अंगझडतीमध्ये ३५३०० रुपये सापडले आणि त्यांच्या चार चाकी वाहनात ९४ हजार रुपये सापडले असे लिहिले आहे. ही बातमी लिहिपर्यंत सुध्दा वडजे विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली नव्हती.

प्रसार माध्यमांना पाठवलेल्या माहितीनुसार वडजेने दहा हजार रुपये लाच स्विकारली हे त्यांचेच सत्य मानले तरी वडजेच्या उजव्या बाजूकडे उभा असलेला हॉफ शर्टवाला व्यक्ती आपल्या पॅन्टच्या डाव्या खिशातील काय वस्तू काढून वडजेच्या पॅन्टच्या मागील बाजूच्या खिशात काय दडवत आहे. तो माणूस इकडे तिकडे सुध्दा लक्ष ठेवत आहे हे त्या व्हिडीयो मध्ये दिसते.हा प्रकार एसीबीच्या कार्यवाहीवर शंका घेण्यासाठी भरपूर आहे. वडजेने पैसे मागितले असतील तरी आपल्या खिशातून कांही तरी काढून वडजेच्या खिशात दडवण्याची एसीबीला काय गरज? या प्रश्‍नाचे उत्तर अवघड आहे. वाचकांच्या सुविधेसाठी जनतेतून कोणी तरी रेकॉर्ड केलेला सापळा कार्यवाहीचा व्हिडीओ आम्ही बातमीसोबत जोडलेला आहे. हा व्हिडीयो वाँट्स अप वर व्हायरल झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *