नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी 14 जून रोजी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एका अल्पवयीन बालकाला शोधले. तो संशयास्पद परिस्थितीत होता. त्याला सोबत घेवून पोलीसांनी त्याच्या वडीलांच्या स्वाधीन केले आहे.
ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, अमिकंठवार आणि रेल्वे पोलीस दलाचे कांबळे आणि राठोड असे रेल्वे स्थानक परिसिरात शोध मोहिम राबवत असतांना 14 जून रोजी मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये त्यांना एक अल्पवयीन बालक संशयास्पद परिस्थितीत दिसला. त्याला सोबत घेवून पोलीसांनी विचारणा केली असता तो सांगवी नाका परिसरातील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी माहिती काढली. त्यानुसार हा मुलगा आई-वडीलांसोबत भांडण झाल्यामुळे कांही एक न सांगता मुंबईला निघून जात होता. पोलीस विभागाने त्याचे वडील दिपक देवकर यांना बोलावून मुलगा त्यांच्या स्वाधीन केला आहे. पोलीस विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, बेवारस, संशयास्पद परिस्थितीत फिरणारे बालके आणि बालिका तसेच इतर कोणी दिसले तर त्याबाबत दिसले तर त्याबाबतची माहिती पोलीस विभागाला कळवून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी अल्पवयीन बालक घरी पाठवला