
नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील एक कुटूंबिय आपल्या अल्पवयीन बालकाला निजामाबाद शहरात शोधत असतांना नांदेड पोलीसांनी ऑपरेश मुस्कान-11 अंतर्गतच्या मोहिमेत तो बालक नांदेड रेल्वे स्थानकावर आपल्या ताब्यात घेतला. त्या बालकाच्या कुटूंबियांनी अत्यंत भावूक शब्दात नांदेड जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेे. तसेच एक दहा वर्षीय बालक नांदेड शहरातलाच होता आणि तो रेल्वे स्थाकावर पोलीसांना सापडला त्या बालकाला सुध्दा नांदेड पोलीसांनी आई-वडीलांपर्यंत पोहचती केले आहे.
ऑपरेश मुस्कान-11 या मोहिमेअंतर्गत पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात ऑपरेश मुस्कान ही कार्यवाही करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक प्रियंका आघाव, पोलीस अंमलदार अच्युत मोरे, मारोती माने, जगदिश कुळकर्णी, लोहमार्गचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे, पोलीस अंमलदार उत्तम कांबळे आणि दिगंबर राठोड यांनी रेल्वे स्थानक परिसरात या मोहिमेअंतर्गत आपली जबाबदारी समजून घेतलेल्या मेहनतीने अनेक बालके पुन्हा आपल्या घरी पोहचली.
दि.15 जनू रोजी हे सर्व पथक रेल्वे स्थानकात अशीच शोध मोहिम राबवत असतांना रुद्रुर ता.बोधन जि.निजामाबाद येथभल एक 17 वर्षीय बालक त्यांच्या नजेरला आला. पोलीसांच्या चाणक्ष्य नजरेने त्या बालकाच्या मनातील घालमेल ओळखली. त्याला जवळ घेवून विचारपुस केली तेंव्हा तो सांगत होता की, या गावात कसा आलो याबद्दल मला कांही एक सांगता येणार नाही पण मी रुद्रुर या गावचा रहिवासी आहे. त्याच्या आई-वडीलांच्या बाबत विचारणा केल्यानंतर पोलीसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपला बालका हरवला आहे आणि आम्ही त्याचा शोध निजामाबाद येथे घेत आहोत असे उत्तर त्या बालकाच्या आई-वडीलांनी दिली. त्यांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. जेंव्हा त्यांच्या मुलाचे बोलणे नांदेड पोलीसांनी त्यांना करवून दिले. अत्यंत जलदगतीने दोघे आई-वडील नांदेडला आहे आणि पोलीसांच्या ताब्यात असलेल्या आपल्या बालकाला परत घेवून गेले. या प्रसंगी अल्पवयीन बालकाच्या आई-वडीलांनी पोलीसांना दिलेले धन्यवाद शब्दात लिहिण्याइतपत आमचीही ताकत नाही.
अशाच परिस्थितीत रेल्वे स्थानकाच्या फलाट 1 वर एक दहा वर्षीय बालक विष्णन अवस्थेत पोलीसांनी शोधला त्याच्याकडे विचारणा केली असता वडील दारु पिऊन रागवत असतात त्या भितीने मी बरेच दिवसापासून रेल्वे स्थानकात राहत आहेत असे सांगितले. पोलीसांची वेळ विचार करण्याची आली. हा बालक यासर कॉलनी, देगलूर नाका परिसराती होता. पोलीसांनी त्याच्या कुटूंबियांशी संपर्क करून त्यांनाही बोलावून घेतले आणि त्यांचा बालक त्यांच्या स्वाधीन केला. ऑपरेशन मुस्कान-11 अंतर्गत काम करणाऱ्या पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही ठिकाणी, अशा परिस्थितील बालक, बालिका जनतेला दिसल्यास त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधून या बद्दलची माहिती द्यावी जेणे करून आपल्या घराची वाट चुकलेल्या बालक-बालिकांना पुन्हा त्यांच्या घरी पोहचविण्याचे भाग्य प्राप्त होईल. आम्ही या समाजात जन्मालो आहोत तेंव्हा या समाजाची सेवा करणे आमचे कर्तव्यच नव्हे तर तो आमचा धर्म आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा प्रत्येक वाचकाला अशा बालकांची माहिती पोलीसांपर्यंत द्यावी असे विनम्र आवाहन करत आहेत.