तीन वर्ष परागंदा झालेले उप जिल्हाधिकारी संतोष वेणीकरला पोलीस कोठडी

नांदेड,(प्रतिनिधी)-कायद्यासोबत गेली तीन वर्ष खेळ करत थकलेले उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर काल न्यायालयासमक्ष हजर झाले. एका रात्रीची न्यायालयीन कोठडी पूर्ण करुन संतोष वेणीकरला आज नायगाव न्यायालयात हजर करण्यात आले. नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी पाटील यांनी तीन दिवस, अर्थात २० जून २०२२ पर्यंत उपजिल्हाधिकाNयाला राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीत पाठविले आहे.

सन २०१८ मध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कार्यकाळात वुंâटूर औद्योगिक वसाहतीच्या इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज वंâपनीमध्ये धान्य घोटाळा उघडकीस आला. त्यावेळी इंडिया मेगा अ‍ॅग्रो अनाज वंâपनीचे मालक अजय बाहेती, वाहतूक वंâत्राटदार राजू पारसेवार, ललितराज खुराणा या मोठ्यांसह अनेक छोटे छोटे लोक पकडले गेले. त्यात शासकीय नोकरीस असलेले गोदामपाल, गोदाम सुरक्षा रक्षक अशा खंडीभर लोकांचा समावेश होता. या धान्य घोटाळ्यामध्ये सुरुवातीचा तपास आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांनी केला होता. पुढे हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग झाला. त्यानंतर या प्रकरणात योग्य भूमिका न घेतल्यामुळे तत्कालीन पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांचेही नाव आहे. गेली तीन वर्ष वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आपल्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करुन संतोष वेणीकर यांनी मागितलेला जामीन सर्वोच्च न्यायालयांनी नाकारला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार संतोष वेणीकर दि.१६ जून रोजी सायंकाळी बिलोली न्यायालयात हजर झाले. बिलोली न्यायालयाने त्यांना एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.

आज दुपारी संतोष वेणीकर पूर्णपणे अत्यंत प्रेâस मूडमध्ये पोलिसांच्या गाडीत न्यायालयात हजर झाले. तेथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप तळपे सुध्दा हजर झाले. घडलेल्या धान्य घोटाळा प्रकरणात संतोष वेणीकरने काहीच कार्यवाही केली नाही ती त्यांची जबाबदारी होती. त्यातून त्यांनी भरपूर संपत्ती जमवली आहे, ती संपत्ती आम्हाला जप्त करायची आहे, त्यांच्या बँकेतील व्यवहार तपासायचे आहेत असे अनेक मुद्दे मांडून सरकारी वकील अ‍ॅड.सुलभा भोसले यांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. संतोष वेंणीकर तर्पेâ अ‍ॅड.श्रीकांत नेवरकर यांनी हा घोटाळा संतोष वेणीकरला पोलीस कोठडी देण्यासारखा नाही असा युक्तीवाद केला. युक्तीवाद ऐवूâन न्यायाधीश अश्विनी भोसले यांनी संतोष वेणीकरला तीन दिवस अर्थात २० जून २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *