
नांदेड,(प्रतिनिधी)- एका भूखंडाच्या वाटणी वादातून आपल्या चुलत बंधूचा खून करणाऱ्या युवकास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस.जाधव यांनी चार दिवस अर्थात २२ जून २०२२ पर्यंत कोठडीत पाठवले आहे.
शहरातील गाडीपुरा भागात पाच भावांमध्ये असलेल्या एका भुखंडाचा वाद दिवसांपासून सुरु होता.त्यातील घटनाक्रमानुसार काल दिनांक १७ जून २०२२ रोजी गाडीपुरा भागातील एक खंबा दर्गाह जवळ मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार (३३) याने आपले मोठे चुलत बंधू शामसिंह प्रकाशसिंह परमार (५०) यांच्यावर खंजीरचे घाव घालून त्यांचा खून केला.खून करून मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार स्वतः पोलीस ठाणे इतवारा येथे रक्ताने माखलेल्या खंजीरसह हजर झाला.
प्रकरणी इतवारा पोलिसांनी मेनकाबाई शामसिंह परमार यांच्या तक्रारीवरून मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार विरुद्ध गुन्हा क्रमांक १५१/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शिवसांभ स्वामी यांच्याकडे देण्यात आला.
आज दिनांक १८ जून २०२२ रोजी सहायक पोलीस निरीक्षक शिवसांभ स्वामी,पोलीस अंमलदार संतोष परकंठे,जाधव यांनी मनोजसिंह राजेंद्रसिंह परमारला न्यायालयात हजर केले.सरकारी वकील ऍड.विजय तोटावार यांनी या प्रकरणी पोलीस कोठडी का देण्यात यावी याचे सादरीकरण केले.युक्तिवाद ऐकून न्या.जाधव यांनी मनोजसिंह राजेंद्रसिंह परमारला चार दिवस अर्थात २२ जून २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/06/17/खून-करून-रक्ताने-माकलेला/