नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-हैद्राबाद रस्त्यावर जबरी चोरी झाली आहे. मौजे वसुर ता.मुखेड येथे चोरी झाली आहे आहे. तसेच हिमायतनगर येथे किराणा दुकान फोडून त्यातून चोरी झाली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये 7 लाख 85 हजार 498 रुपयंाचा ऐवज चोरीला गेला आहे.
सचिन गोविंदराव बादल हे 19 जून रोजी रात्री 8.30 वाजता नांदेड-हैद्राबाद रस्त्यावरून एम.एच.26 झेड. 9708 या दुचाकीवर आपली पत्नी आणि मुलीसह जात असतांना किंकड्या पुलाजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.जी.9424 वर बसून आलेल्या दोन जणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक नरवटे अधिक तपास करीत आहेत.
बालाजी जयराम निरटीवार यांचे मौजे वसुर ता.मुखेड येथील घर चोरट्यांनी 18 जूनच्या पहाटे 8 ते 19 जूनच्या पहाटे 8 वाजेदरम्यान फोडले. कपाटाला डुबलिकेट चाबीने उघडून लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा 7 लाख 16 हजार 498 रुपयंाचा ऐवज चोरुन नेला आहे. मुक्रामाबाद पोलीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कांगणे अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर येथील ऋषीकेश दिगंबर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे पळसपूर येथे त्यांचे किराणा दुकान आहे. 19 जूनच्या मध्यरात्री कोणी तरी ते दुकान फोडले. सोबतच शेजाऱ्यांचेही दुकान फोडले. यासोबत दोन्ही दुकानांमधून रोख रक्कम आणि कापड असा 55 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास महिला पोलीस अंमलदार कागणे ह्या करीत आहेत.
तीन चोरींच्या घटनांमध्ये 7 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास