नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या दुकानातील साहित्य चोरून ते सर्व साहित्य नाल्यात टाकून नुकसान केल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनुसार मुक्रामाबाद पोलीसांनी 7 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
राजूरा (बु) ता.मुखेड येथील मेकॅनिक बालाजी नरसींग कोरकोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजूरा गावात त्यांच्या एका टिनपत्राच्या दुकानात ठेवलेले साहित्य गायब झाले. हा प्रकार 18 जूनच्या सकाळी 8 वाजता समजला. त्या टिनपत्राच्या दुकानात विद्युत मोटारी, विद्युत साहित्य, खत, सोयाबीन बॅगा आणि रोख 50 हजार रुपये असे 2 लाख 31 हजार रुपयांचे साहित्य राजूरा येथीलच दत्ता गोविंद गालचलवार, बालाजी गंगाराम चंदावार, अंतेश्र्वर गंगाराम चंदावार, संदीप राम गालचलवार, लक्ष्मीबाई गोविंद गालचलवार आणि राम ईरवंतराव गालचलवार या सर्वांनी चोरून नेले आणि नाल्यात फेकून दिले. मुक्रमाबााद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 152/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 461, 379, 427 आणि 34 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार आडेकर अधिक तपास करीत आहेत.
2 लाख 31 हजारांचे साहित्य चोरून नाल्यात टाकले ; सात जणांवर गुन्हा दाखल