नांदेड(प्रतिनिधी)-अज्ञात चोरट्यांनी धर्माबाद येथे एक दुकान फोडून 1 लाख 43 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कंधार शहरातील भवानीनगर भागात एका किराणा दुकानाला फोडून त्यातून साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न घडला आहे. जंगमवाडी नांदेड भागातुन 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. बोरवाडी ता.भोकर येथून शेतातून 15 हजारांचे साहित्य चोरीला गेले आहे.
अर्धापूर येथील शेख हरुन शेख रमजान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जूनच्या रात्री 10.30 ते 24 जूनच्या सकाळी सकाळी 8.30 वाजेदरम्यान जलाराम वजन काटाच्या शेजारी असलेले त्यांचे मालकीचे इंडिया इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड होमऍप्लायन्स हे दुकान कोणी तरी चोरट्यांनी फोडून त्यातील 1 लाख 43 हजार 500 रुपयांचा साहित्य चोरून नेले आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे अधिक तपास करीत आहेत.
बन्सीलाल व्यास यांचे भवानीनगर कंधार येथे किराणा दुकान आहे. खाली दुकान आणि वर घर अशी त्यांच्या घराची स्थिती आहे. 23 जनू रोजी रात्री 11.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून दुकानातील किराणा साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केला.या तक्रारीत आरोपींची नामे नमुद करण्यात आली आहेत. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गणाचार्य यांच्याकडे तपास देण्यात आला.
निळकंठ शंकरराव पांडे यांची दुचाकी गाडी 17-18 जूनच्या रात्री त्यांचे घर, काळीजी टेकडी नांदेड येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार राठोड हे करीत आहेत.
रमेश उध्दवराव जुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जून रोजी सकाळी 6 वाजता आपल्या जंगमवाडी येथील घरात त्यांनी दरवाज्याजवळ आपला मोबाईल चार्जींगला लावला आणि इतर कामे करत असतेवेळेस कोणी तरी अज्ञात व्यक्तीने त्यांचा 19 हजार 999 रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार हुंडे हे करीत आहेत.
बोरगाव ता.भोकर येथील बालाजी देवराव भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17-18 जूनच्या रात्री त्यांच्या शेतातील मोटार, वायर असे 15 हजार रुपयांचे साहित्य कोणी तरी चोरून नेले आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार लक्षटवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
अर्धापूर शहरात दुकान फोडून 1 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास