नांदेड,(प्रतिनिधी)- भूखंड आणि शेत जमिनींचा वाद आता शिगेला पोहचला आहे.परवा शिवाजीनगर पोलिसांनी जागेच्या ताबा घेण्याच्या वादातून एक गुन्हा दाखल केला आहे.काल असाच एक गुन्हा विमानतळ पोलिसांनी दाखल केला आहे.त्यात एका जमिनीवर असलेले सिमेंट खांब जेसीबीने तोडून टाकण्यात आले आहे. त्या जागेच्या नोंदणी दस्तात अनेक जागी खोटारडेपणा केलेला आहे.
गंगाधर रामराव खोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांगवी येथे गट क्रमांक २६५ मध्ये एकूण ३ एकर १ गुंठा अशी त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे.त्या जमिनी लगत इंदिराबाई अमृतराव कल्याणकर यांची शेत जमीन आहे.सन २००८ पासून कल्याणकर यांच्या जमिनीचे मुख्तारआम पत्र सैयद नसीम रफी अहमद यांच्याकडे आहे.त्या बाबत तयार झलेल्या मुद्रांक दस्त ऐवजात अनेक जागी खोटे पणा केलेला आहे.नकाशा एक,त्यावर नंबर नाही असा बनावट पणा त्यात आहे.
दिनांक ६ मे २०२२ रोजी सैयद नसीम सैयद रफी अहमद,मो.शाहनवाज खान मो.नामदारखान,शेख आबिद खाजामिया, रियाजोद्दीन वसियोद्दीन मुजावर,शेख वसीम शेख चाँद, अकबर हुसेन आणि वसियोद्दीन रियाजोद्दीन मुजावर अश्या ७ लोकांनी त्या जमिनीवर येऊन माझे शेतात रोवलेले सिमेंट खांब जेसीबीच्या वापराने तोडले.तसेच मला मारहाण करून धमक्या दिल्या.तेव्हा सांगितले की तुझी सर्व जमीन न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकवून टाकतो.
विमानतळ पोलिसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक २१८/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६७,४६८,४७१,३८४, १४३,४२७,५०४,५०६ नुसार सात जणांविरुद्ध दाखल केला आहे. या गुन्ह्यातील संपूर्ण घटनाक्रम १५ एप्रिल २००८ ते ६ मे २०२२ दरम्यान घडला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास विमानतळचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे करीत आहेत.