नांदेड जिल्हा पोलीस दलाची सीसीटीएनएस कामगिरी राज्यात तिसरी आणि परिक्षेत्रात पहिली

नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथील अपर पोलीस महासंचालक राज्यातील जिल्हा निहाय सीसीटीएनएस कामगिरीबाबत दरमहा आढावा घेत असतात. मे 2022 मधील सीसीटीएनएस कामगिरीमध्ये नांदेड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक राज्यस्तरावर आला आहे. परिक्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा क्रमांक पहिला आहे.
नांदेड जिल्ह्यात 36 पोलीस ठाणे आहेत. ती सर्व पोलीस ठाणे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडलेले आहेत. यामध्ये प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोपपत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मयत व्यक्ती, अदखलपात्र खबर, गहाळ आणि बेवारस मालमत्ता, प्रतिबंधक कार्यवाही अशा विविध प्रकारच्या 18 माहिती सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरल्या जातात. या प्रणालीचा उपयोग करून गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघड या संदर्भाने सुध्दा बरीच मदत मिळते. तसेच ITSSO आणि ICJS पोर्टलचा प्रभावीपणे वापर करून मे 2022 मध्ये नांदेड जिल्ह्याला 242 गुणांपैकी 220 गुण प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्यात सीसीटीएनएस प्रणालीच्या उपयोगात नांदेड जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातील लातूर, परभणी, हिंगोली यांच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सीसीटीएनएस प्रणालीचे नोडल अधिकारी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि सीसी टीएनएस टीमने घेतलेल्या मेहनतीमुळेच हे क्रमांक प्राप्त झाले आहे यासाठी सर्वांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *