अवैध धंद्यात नामांकित व्यक्तीकडे मागितली खंडणी ; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याने सन 2019 मध्ये घडलेला खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. मकोका प्रकरणात आज तुरूंगात असलेले कांही जण यात आरोपी आहेत.
वजिराबाद राहणारे एक व्यक्ती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 फेबु्रवारी 2019 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेदरम्यान चरणसिंघ संधू (रिंदाचे वडील) यांच्या सांगण्यावरुन इंदरपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर (35) रा.चिखलवाडी नांदेड आणि हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंघ बाजवा (35) रा.रामदास यात्रीनिवास नांदेड आणि लक्की गिल या तिघांनी मिळून अनवर अली खानने खरेदी केलेल्या जमीनीतील रक्कमेच्या 50 टक्के रक्कम देण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला असा या तक्रारीचा आशय आहे. अवैध धंदे करण्यामध्ये सुध्दा यांचे नाव नामांकित आहे. वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार 29 जून 2022 रोजी गुन्हा क्रमांक 228/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 387 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *