नांदेड(प्रतिनिधी)-शेती पेरणी आणि वाटणीच्या कारणावरून दोन भावांनी मिळून आपल्या वडीलांचा गळा दोरीने आवळून त्यांचा खून केल्याचा प्रकार खेडकरवाडी शिवारातील शेतात घडला आहे.
प्रभाकर घनशाम वलांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 जून रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास खेडकरवाडी शिवारातील हौगी नारायण कल्याणे यांच्या शेतात त्यांचे दोन पुत्र सचिन आणि हनमंत यांनी वडीलांसोबत पेरणी कशी करायची आहे. त्यातील वाटणी कशी करायची आहे यावरून वाद घातला. भांडणाच्या या घटनेत दोन्ही भावांनी मिळून आपल्या वडीलांच्या गळ्यात दौरी आवळून त्यांचा खून केला आहे. माळाकोळी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक डोके अधिक तपास करीत आहेत.
दोन भावांनी मिळून वडीलांचा गळा आवळून खून केला