नांदेड(प्रतिनिधी)-आज महानगरपालिकेच्या पथकाने २९१ दुकानांना भेटी दिल्या त्यातील ११ दुकानांमध्ये सापडलेले ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त केले आणि त्यांच्याकडून ६० हजार रुपये दंड वसुल केला. सोबतच उपद्रवी कृत्य केल्याबाबत १२ हजार ८०० रुपये वेगळा दंड वसुल केला. असा एकूण ७२ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. नागरीकांनी प्लॅस्टीक ऐवजी कपड्याच्या पिशव्या वापराव्यात आणि दंडात्मक कार्यवाहीपासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनात शहरातील क्षेत्रीय कार्यालय क्रमांक १ ते ६ दरम्यान आज प्लॅस्टीक वापराचा तपासणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या नियंत्रणाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरिक्षक आणि त्यांच्या पथकाने या कार्यवाहीत भाग घेतला. मनपा पथकाने एकूण २९१ दुकानंाना भेटी दिल्या. त्यात ३२१ किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले. ११ व्यावसायीकांकडून ६० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच उपद्रवी कृत्य केल्याप्रकरणी १२ हजार ८०० रुपये दंड वसुल केला. एकूण दंडाची रक्कम ७२ हजार ८०० रुपये आहे.
ही माहिती प्रसिध्दीसाठी प्रसार माध्यमांकडे पाठवितांना महानगरपालिकेने दंड वसुल केलेल्या आस्थापनांची नावे देण्याचे औदार्य मात्र दाखवलेले नाही. ज्यांना दंड लावला आहे. त्यांची नावे सुध्दा प्रसिध्द होणे आवश्यक आहे जेणे करून इतर व्यावसायीकांना जाग येईल. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला आवाहन करत आहे की, प्लॉस्टीक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा. पर्यावरणाचे आरोग्य राखा आणि आपल्यावर दंडात्मक कार्यवाही होणार नाही याची दक्षता घ्या.
