नांदेड(प्रतिनिधी)-किसान फॅन मॉल आणि डिमार्ट येथून महानगरपालिकेच्या पथकाने जवळपास 1 क्विंटल प्लॉस्टिक जप्त केले आहे. या दोन्ही व्यावसायीक प्रतिष्ठांकडून 10 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सोबतच 7 नागरीकांवर सुध्दा उपद्रवकारकृत्य केले म्हणून 4 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
नांदेड शहर प्लॉस्टिकमुक्त करण्यासाठी मनपाच्या पथकाने आयटीआय कॉर्नर येथील किसान फॅशन मॉल आणि बिग बाजार येथील डी.मार्ट येथे छापा टाकला. शासनाकडून प्रतिबंधीत असलेले अंदोजे एक क्विंटल प्लॉस्टिक येथून जप्त करण्यात आले आहे. किसान मॉल आणि डीमार्ट या दोघांना प्रत्येकी 5 हजार रुपये असा 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर राडा-रोडा टाकून उपद्रवकारक कृत्य करणाऱ्या सात नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करून त्यांच्याकडून 4 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. या पुढे सुध्दा शहरात प्लॉस्टिक वापरणारे व्यावसायीक प्रतिष्ठाण, नागरीक यांच्यावर सुध्दा कार्यवाही केली जाणार आहे. रस्त्यावर राडा रोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुध्द कार्यवाही होणार आहे.
ही कार्यवाही मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबासाहेब मनोहरे, गिरीश कदम, उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी राजेश चव्हाण, रमेश चवरे, डॉ.रईसोद्दीन, मुख्य स्वच्छता निरिक्षक वसीम तडवी, स्वच्छता निरिक्षक मोहन लांडगे, संजय जगतकर, शेख नईम, किशन वाघमारे, किशन तारु, विजय वाघमारे यांनी केली आहे.
किसान फॅशन मॉल व डिमार्टला प्रत्येकी 5 हजार रुपये दंड