नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ते बिदर अशा गाड्या चालवायच्या असतील तर 25 हजार रुपये महिना खंडणी मागणाऱ्या एका विरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साहेबसिंग रामसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे पाच गाड्या आहेत आणि या गाड्या नांदेड-बिदर या रस्त्यावर भाविकांना घेवून जातात. सोबतच नांदेडच्या आसपास असलेल्या गुरूद्वाऱ्यांच्या दर्शनासाठी भाविकांना घेवून जातात. दि.4 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता नगिनाघाटजवळ गोविंदसिंघ हरीसिंघ पुजारी यांनी साहेबसिंग राठोडला तुझ्या गाड्या चालवायच्या असतील तर त्यासाठी दरमहा 25 हजार रुपये मला द्यावे लागेल ही खंडणी दिली नाही तर मी तुला जिवे मारून टाकेल अशी धमकी दिली. वजिराबाद पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 386 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 233/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक मनठाळे करीत आहेत.
नांदेड-बिदर गाड्या चालविण्यासाठी खंडणीची मागणी ; गुन्हा दाखल