नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात देगलूर येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 78 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 हजार 996 रुपयांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. दत्तनगर भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 45 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समीरा बाग येथे एक घरफोडण्यात आले असून त्यातून 21 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मुदखेड, माहूर आणि किनवट या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यातील एका दुचाकीची किंमत लिहिले नाही. इतर दोन दुचाकींची किंमत 60 हजार रुपये आहे. कासराळी ता.बिलोली येथे एका शेतातून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि एक गोरा चोरीला गेला आहे. नवा मोंढा येथील एसबीआय बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे 44 हजार रुपये चोरण्यात आले आहेत. विश्रामगृह नरसी येथून विद्युत वायर किंमत 4 हजार 500 रुपयांची चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये एकूण 3 लाख 88 हजार 499 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
Related Posts
नांदेड ग्रामीण येथील गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखाने पकडला 40 किलो गांजा
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख शेख असद यांनी तोंडी आदेशाने तेथे कार्यरत पोलीस निरीक्षक अशोकरावजी…
प्राध्यापिकेच्या घरातून 25 लाखांपेक्षा जास्तची चोरी; एकाला अटक, काही सोन्याचे दागिणे जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-प्राध्यापिकेच्या घरातून 25 लाखापेक्षा जास्त रक्कमेची चोरी करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिरहारी यांनी आज 5 डिसेंबरपर्यंत दुसऱ्यांदा…
दुकान फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील नांदेड ते लातूर रोडवरील स्मशानभुमीच्या बाजूला असणाऱ्या सदगुरू इंजिनिअर वर्कसचे दुकान अज्ञात आरोपीने शटर फोडून दुकानातील मोटार भरण्याची…