नांदेड(प्रतिनिधी)-देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत आज सकाळी एक मृतदेह तरंगतांना आढळला. तो मृतदेह शिवकणी क्लासेसचे कैलास राठोड यांच्या बंधूचा आहे.
आज दि.6 जुलै रोजीचा सुर्योदय झाल्यानंतर देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत एक मृतदेह तरंगातांना अनेकांनी पाहिला. माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्नीशमन पथक, पोलीस पथक तेथे पोहचले. तो मृतदेह पाण्यात उताण्या अवस्थेत तरंगत होता. तो मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर मृतदेहाचे तोंड पाहिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. शिकवणी क्लासेसमध्ये नामांकित असलेल्या कैलास राठोड यांचे ते भाऊ इंदल राठोड असल्याची माहिती सांगण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होत आहे.
देविगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागील विहिरीत सापडलेला मृतदेह कैलास राठोडचे बंधू इंदल राठोडचा