नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर्सलेन भागातील गुरू ड्रग हे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनल रोड येथील एका घरातून 20 हजार रुपयांचा संगणक, 10 हजार रुपये रोख रक्कम आणि 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.बऱ्यामसिंघनगर भागातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. पीपल्स कॉलेज रस्त्यावरून एक दुचाकी चोरीला गेली आहे. मुखेड येथील एका हायवा गाडीमध्ये लावलेल्या 36 हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तसेच एका शाळेचे बांधकाम सुरू असतांना गोपाळनगर सांगवी भागातून 51 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले आहे.
Related Posts
मराठा मुक आंदोलन आयोजित करणाऱ्या 21 जणांवर गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मुक आंदोलन बिना परवानगीचेच झाले, कोविड नियमावलींचा भंग करण्यात आला अशा स्वरुपाचा गुन्हा 21 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी दाखल…
नांदेड येथून उचलून नेऊन मुंबईच्या उपनगरात 20 वर्षीय युवतीवर गॅंगरेप
नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीवर तिला पळवून देऊन तिच्यावर गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवतीने भोकर पोलीस…
स्थानिक गुन्हा शाखेला कांही गुन्हेगार शोधण्यात का रस नसेल ?
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळ्या कारणांनी दहशत माजवून सर्वसामान्य नागरीकांना त्रासदायक ठरलेल्या अनेक आरोपींना पकडण्यात नांदेडची स्थानिक गुन्हे शाखा नेहमीच प्रथम क्रमांकावर…