नांदेड(प्रतिनिधी)-चंदासिंग कॉर्नरजवळ एका घरात प्रवेश करून तिन जणांनी पती-पत्नीवर जिवघेणा हल्ला केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी एकाला अटक केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीएस.एम.बिरहारी जगताप यांनी त्याला दोन दिवस अर्थात 8 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
राजेंद्र विश्र्वनाथ वानोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.5 जुलैच्या सकाळी 5.45 वाजता त्यांच्या घरात ते आणि त्यांची पत्नी हजर असतांना अविनाश वानोळे, विजयमाला वानोळे रा.चंदासिंग कॉर्नर आणि शिवराम दशरथ धायगुडे रा.पिंपळा ता.अंबेजोगाई जि.बीड हे तिघे घरात आले. त्यावेळी हातातील कत्येने त्यांच्या मानेवर वार करण्यात आला. तो वार त्यांनी हाताने पकडला. तेंव्हा त्यांची पत्नी त्यांना वाचविण्यासाठी आली तेंव्हा तिच्या डोक्यात कत्ती मारून या लोकांनी जिवघेणा हल्ला केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 398/2022 कलम 307, 452, 109 भारतीय दंड संहिता आणि भारतीय हत्यार कायद्याच्या 4/27 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे यांच्याकडे देण्यात आला.
पोलीस उपनिरिक्षक बालाजी नरवटे,पोलीस अंमलदार शिंदे यांनी आज दि.6 जुलै रोजी शिवराम दशरथ धायगुडे या तिघांना न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडी मागितली तेंव्हा न्यायाधीशबिरहारी यांनी ती मंजुर करत धायगुडेला 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.