नांदेड,(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या एका युवकाने आपल्या कंपनीत काम करणाऱ्या २० वर्षीय युवतीसोबत बळजबरी अत्याचार करून तिला जाती विषयक गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या युवकाला शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने हैद्राबादच्या विमानतळावरून पकडून आणले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कार्यालयात नोकरी करणाऱ्या एका २० वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार ती नांदेडच्या तथागत नगरमध्ये राहणार युवक दीपक चांदोबा कांबळे(३६) यांच्या कंपनीत सप्टेंबर २०२० पासून कार्यरत होती.आपल्या सोबत काम करणाऱ्या २० वर्षीय युवतीसोबत परिस्थितीचा फायदा घेत दिपक कांबळेने नांदेड,मुंबई येथे कामाच्या कारणाने नेवून तिच्यावर अत्याचार केला.सोबतच तिला अत्याचाराची वाच्यता केली तर ऑट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबावर दाखल करेल अशी धमकी दिली.दिपक कांबळेच्या पत्नीला घडलेले प्रकार सांगितले तर तिने सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली.अत्याचार करून दिपक कांबळे त्या युवतीसोबत लग्न सुद्धा करू इच्छित होता.त्यासाठी धमक्या देत होता.
या नुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा क्रमांक २६०/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एन) आणि ५०६ नुसार दाखल केला.घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आरोपी दिपक कांबळेला त्वरित पकडण्याच्या सूचना शिवाजीनगरचे पोल्सी निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांना दिल्या.
या नुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा क्रमांक २६०/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एन) आणि ५०६ नुसार दाखल केला.घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी आरोपी दिपक कांबळेला त्वरित पकडण्याच्या सूचना शिवाजीनगरचे पोल्सी निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांना दिल्या.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे,सोबत पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे,पोलीस अंमलदार शेख इब्राहिम,दिलीप राठोड, रविशंकर बामणे,देवसिंह सिंगल,शेख अझहर,दत्ता वडजे, दीपक ओढणे आणि सायबर विभागाचे राजेंद्र सिटीकर असे पथक आरोपी शोध कामी रवाना झाले.पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बलात्कारातील आरोपी दीपक कांबळे हा हैद्राबाद (तेलंगाणा) येथे आहे.पोलीस पथक हैद्राबादला पोहचले तर दिपक कांबळे हा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानळावरून केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे जाणार असल्याचे पोलिसांना समजले. नांदेडच्या पोलीस पथकाने विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्यास काय हवे आहे याची माहिती दिली. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगरच्या गुन्हेशोध पथकासोबत त्रिवेंद्रमला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दिपक कांबळेच्या मुसक्या आवळल्या. अत्यंत विद्युत गतीने हैद्राबाद विमानतळ गाठून आरोपीस गजाआड करणाऱ्या पोलीस पथकासाठी लिहावेच लागेल की,’काय तो गुन्हा,काय ते साहेबांचे आदेश,काय आपली गती,काय जबाबदारीची जाणीव सर्वच ओके हाय’