भोकर (प्रतिनिधी)-शहरातील जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेला नामवंत, किर्तीवंत, गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि गुणवत्तेत दिवसेंदिवस भर घालणार्या इथल्या उच्चशिक्षित गुरुजनांनी आगळेवेगळे अन अव्वल स्थान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. नूतनची गौरवाची किर्तीध्वजा सतत डौलाने उंचावत राहण्यात या सर्वांची भूमिका महत्वाची आहे.
नुकताच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल लागला आणि निवडयादीमध्ये नूतन शाळेच्या *कु.संचिता शुद्धोधन गुंडेकर* या विद्यार्थीनीने स्थान मिळवत बाजी मारली आहे. तिने नांदेड जिल्ह्यातून नववा क्रमांक मिळवला आहे.खरंतर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत यश मिळवणे हे एक प्रकारचे दिव्यच असते. त्यातही शहरी भागाला कमी प्रमाणात संधी असल्याने पुन्हा अवघड बाब कारण शहरी भागातील विद्यार्थ्यात तीव्र स्पर्धा असते. पण मनाची जिद्द आणि अभ्यासातील सातत्य असल्यास आणि सोबतीला तज्ञांचे मार्गदर्शन असल्यास या जगात काहीही अशक्य नसते हेच कु.संचिताने दाखवून दिले.
जि.प.कें.प्रा.शा.नूतनमध्ये नेहमीच अभ्यासपूर्ण, नाविण्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले जातात. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मा.डाॅ.डी.एस.मठपती यांनी दाखवलेल्या नियोजनपथावर चालल्याने हे यश मिळू शकले अशी भावना या विद्यार्थीनीच्या यशात मानकरी असणार्या सुषमा बुडकेवार,श्रीमती शोभा हंचनाळे , .प्रमोद पाटील,.सुरतबन्सी,,भंडरवार शंकर यांनी याप्रसंगी बोलून दाखवली.
तसेच नवोदय सारख्या स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांना गणिता सारख्या अवघड वाटणाऱ्या विषयाचा सौ.हंचनाळे यांनी शाळेत तसेच घरून आॕनलाईन पद्धतीने व वेगवेगळ्या ट्रिक्सच्या द्वारे विद्यार्थ्यांकडून अधिकचा सराव करून घेऊन तो विषय अगदी सोपा करून दाखवला . असे यशस्वी विद्यार्थीनी संचिता हिने सांगितले.
कु.संचिताने मिळविलेल्या या घवघवीत, दैदिप्यमान यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी वाघमारे एम.जी. , विस्तार अधिकारी .शिरसाट ए.एन., केंद्रप्रमुख पडलवार बी.जी. , शाळेचे मुख्याध्यापक पट्टेवाड एम.एल. ,पर्यवेक्षक जाधव एम.जी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .गजाननराव चोथे तसेच नूतन शाळेतील समस्त शिक्षकवृंदांनी आणि अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिच्या पुढील उज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छाही दिल्या आहेत.