नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांचे आज दि.12 जुलै रोजी रात्री दीड वाजेच्यासुमारास रेल्वेतून प्रवास करतांना झालेल्या अपघातात निधन झाले आहे.
नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ सुरजितसिंघ वाधवा (56) हे काल दि.11 जुलै रोजीच्या राजराणी या जलदगती रेल्वे गाडीने मुंबईसाठी प्रवासाला निघाले होते. ही गाडी रात्री 1 वाजेच्यासुमारास जालना रेल्वे स्थानकापुर्वी असलेल्या कोडी रेल्वे स्थानकावरून न थांबता पुढे गेली. गाडी पुढे गेल्यावर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळांजवळ एक माणुस पडलेला दिसला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबादकडे दिली. औरंगाबादने नंतर ही माहिती जालना येथील आपल्या कर्मचाऱ्यांकडे पोहचती केली. जालना येथील रेल्वे पोलीसांनी पुढील कायदेशीर कार्यवाही करत काम केले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरविंदरसिंघ वाधवा ज्या वातानुकूलीत कक्षातून प्रवास करत होते. त्यांचे बॅग आणि मोबाईल तसाच रेल्वेत पुढे गेला.पण कल्याण रेल्वे स्थानकावर ते साहित्य रेल्वे पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. गेली अनेक वर्षापासून गुरविंदरसिंघ वाधवा नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक या पदावर कार्यरत होते. पुर्वी ते बॅंकेत कार्यरत होते. त्यानंतर काही खाजगी व्यवसाय केले आणि बऱ्याच वर्षापासून ते गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक पदावर कार्यरत होते.
गुरूद्वारा बोर्ड अधिक्षक वाधवा यांचे रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन