नांदेड(प्रतिनिधी)-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण एका धावत्या भेटीसाठी खजुराहो विमानतळावर आले असतांना त्यांना दिलेली चहा थंड होती म्हणून राजनगरच्या विभागीय दंडाधिकाऱ्यांनी कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केलेली आहे. हे पत्र व्हॉटसऍप संकेतस्थळावर व्हायरल झाले आहे.
दि.11 जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे एका धावत्या भेटीसाठी खजुराहो विमानतळावर आले होते. त्या संदर्भाने मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्यासाठी चहा आणि नास्ता सोय करण्याची जबाबदारी कनिष्ठ पुरवठा अधिकारी राजनगर जि.छत्तरपुर यांच्यावर देण्यात आली होती. त्यासाठी 9 जुलै रोजी पत्र पण देण्यात आले होते.
विभागीय दंडाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण पुरविण्यात आलेले चहा थंड होती. यामुळे जिल्हा प्रशासनाची स्थिती अशोभनिय झाली. आपण व्ही.व्ही.आय.पी.व्यक्तींच्या व्यवस्थेमध्ये अत्यंत निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे आपल्या विरुध्द कठोर अनुशासनात्मक कार्यवाही करण्याचा विचार सुरू आहे. याचे उत्तर तीन दिवसात द्यावे असे पत्र 11 जुलै 2022 रोजी छत्तरपुर जिल्ह्यातील राजनगरचे कनिष्ठ पुरवठा अधिकारी राकेश कन्हुआ यांना पाठविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चहा सेवेमध्ये कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याने केली चुक त्यासाठी भारीच पडलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पिलेल्या चहाबद्दल आपल्या भावना सुध्दा व्यक्त केल्या असतील म्हणूनच आता कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात मात्र अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या सर्व सोयी उत्कृष्टपणे करण्यात बरेच तरबेज लोक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कधी अशी परिस्थिती तयार झालेली दिसली नाही.