नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
बिलोलीच्या जिल्हा न्यायाधीशांनी आपले सासरे-सासु-मेहुणे यांच्याविरुध्द दाखल केला गुन्हा
इतरांना न्याय देणाऱ्या न्यायाधीशांची पत्नी इतर न्यायाधीशांकडे न्यायासाठी उंबरठे झिजवत आहे नांदेड(प्रतिनिधी)-माझे सासु-सासरे आणि मेहुणा माझ्या पत्नीला मिळणाऱ्या पोटगीच्या रक्कमेचा…
महापालिकेत स्थायी समितीची सभा संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)- महापालिकेत आज दि.06 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची…
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ग्रीलमध्ये पाय अडकलेल्याची अर्ध्या तासानंतर सुटका
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यद्वारापासून आत जातांना एका 52 वर्षीय व्यक्तीचा पाय लोखंडी ग्रिलमध्ये अडकला आणि अर्धातास झटल्यानंतर नांदेड महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने…