नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्या मुलीच्या शिक्षण कामासाठी नांदेडला आलेल्या भुसावळ जिल्ह्यातील एका प्रवाशाची बॅग ऑटो चालकाने परत केली आहे.प्रवाशाने ऑटो चालकाचे आभार व्यक्त केले आहेत.
गणेश जावरे रा.भुसावळ जिल्हा हे प्रवाशी दिनांक ११ जुलै रोजी नांदेडला आपल्या कन्येच्या शिक्षण कार्यासाठी आले होते. डॉ.मौलाना अब्दुल कलाम ऑटो स्टॅन्ड वरून भाग्यनगरसाठी त्यांनी ऑटो रिक्षा क्रमांक MH 26 BD 3887 घेतली.ती रिक्षा टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड चे सदस्य, शेख हाजी साहाब रा गवलीपुरा, नांदेड यांची होती.भाग्यनगर येथे ऑटो रिक्षा सोडली.तेव्हा रिक्षा चालक हाजी साहेब परत रेल्वे स्थानकावर आले.त्या ऑटोत गणेश जावरे यांची बॅग विसरून राहिली होती.हि घटना हाजी यांच्या लक्षात आली.प्रवाशांना धसका बसला कि आपली महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि बॅग रिक्षा मध्ये विसरली आहे. तेव्हा गणेश जावरे पुन्हा रेल्वे स्थानकाजवळ आले.तेथे हाजी साहेब यांनी वाहतूक पोलीस अंमलदार सुंधाकर कांबळे यांच्या हस्ते आणि ऑटो संघटनेचे सदस्य कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, सदस्य नासिर खान यांच्या समक्ष हाजीसाहाब यांनी त्यांना परत केली. गणेश जावरे,त्यांच्या पत्नी आणि मुलीने ऑटो चालक हाजी साहेब यांचे आभार व्यक्त केले आहेत.