नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला तोतयेगिरी करून तिच्या कानातील 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके आणि 21 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र असा 46 हजार रुपयांचा ऐवज एका ठकसेनाने लुटला आहे.
इंदुबाई दयानंद वाठोरे या महिला 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास आसना ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत असतांना टाटा शोरुमसमोर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यासोबत बनावटपणा करून त्यांना फसवले आणि त्यांचे 46 हजार रुपये किंमतीचे दागिणे काढून घेवून त्यांची फसवणूक केली आणि विश्र्वासघात केला अशा आशयाची तक्रार विमानतळ पोलीसांनी नोंदवली आहे. विमानतळ पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला फसवून 41 हजार रुपयांचे दागिणे गंडवले