नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी हसापूर शिवारात एका 52 पत्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांविरुध्द गुन्हा लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
दि.16 जुलै रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या समवेत गस्त करत असतांना नवीन हस्सापूर येथे शेख हमीद अहेमद यांच्या टीनशेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि तेथे छापा टाकला. तेथे शेख जुनेद शेख युसूफ (24), शेख अली शेख हुसेन (36), शेख एजाज शेख मुस्सा (27), सय्यद मोसीन सय्यद वसीम (25), मिर्झा शब्बर गफार बेग , शेख पाशा या सहा जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 117/ 22 दाखल केला आहे.