नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीच्या परस्पर त्याचे नावाचे कागदपत्र आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून गृहकर्ज उचलणाऱ्या तीन जणांविरुध्द मांडवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.
अंकुश गुलाब कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2018 ते आजपर्यंत मौजे सिंदवाडा तांडा ता.किनवट येथे संजय विजय चव्हाण (39), रेषमा विजय चव्हाण (35) दोघे रा.सिंदवाडा तांडा आणि महेंद्रा होम फायनान्स शाखा किनवट येथे कार्यरत पंकज आर.कौशल (35) या तिघांनी मिळून त्यांच्या नावाचा परस्पर वापर जामीनदार म्हणून केला. त्यांच्या नावाची खोटी कागदपत्र दिली. त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार किनवट न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मांडवी पोलीसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
बोगस कागदपत्र आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून होमलोन उचलले