चोरीची 6 हजार रुपये रक्कम जप्त; दोन चोरटे अटकेत
नांदेड(प्रतिनिधी)-श्रावस्तीनगर भागात दुुकान फोडून झालेल्या चोरीचा गुन्हा शिवाजी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने 10 तासात उघड करून दोन चोरट्यांना पकडले आहे. चोरलेली 6 हजार रुपये रोख रक्कम सुध्दा जप्त केली आहे.
दि.16 -17 जुलैच्या रात्री श्रावस्तीनगर भागातील अशोक दिगंबर निखाते यांचे किराणा दुकान बंद झाल्यानंतर त्या दुकानाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कॅश बॉक्समध्ये ठेवलेले 6 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. याबद्दल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 237/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 357, 380 नुसार दाखल झाला.
शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी आपल्या गुप्तहेरांना याबाबत माहिती काढण्यास सांगितले त्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंह सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे यांनी 10 तासांच्या आत राज उर्फ सोनु विजय भदरगे (23) रा.श्रावस्तीनगर आणि प्रधान उर्फ मन्या रमेश दुधमल (22) रा.नसरतपुर नांदेड या दोघांना अटक करून त्यांनी चोरलेली 6 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. 10 तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे आणि डॉ.नितीन काशीकर यांचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले आहे.
शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने 10 तासात चोरीचा गुन्हा उघड केला