नांदेड,(प्रतिनिधी)- दोन दिवसात जीवे मारण्याचे अल्टिमेटम देणाऱ्या विरुद्ध इतवारा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हयाची नोंद करून घेतली आहे.
पंढरीनाथ रामदास कुलथे रा.पाठक गल्ली नांदेड यांनी २१ जुलै रोजी नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार की,सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या दुकानाजवळ थांबले असतांना नरसिंग उर्फ पिंटू लक्ष्मण मालवतकर रा.शंकराचार्य मठाजवळ सिद्धनाथपुरी हा दुचाकीवर बसून आला आणि मला सांगत होता की,आता दोन दिवसात तुझा नंबर आहे,तुला खतम करतो.या पिंटू माळवतकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी कुलथे यांच्या घरात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला रस्ताही पिंटू आणि त्याच्या साथीदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ सह अनेक कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर काही महिन्यांनी याच पिंटू माळवतकरच्या घरातून अनेक घातक हत्यारे जप्त करण्यात आली होती.हो वेगळा गुन्हा दाखल आहे.तरी मला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पिंटू माळवतकरविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी.इतवारा पोलिसांनी याबाबत असंज्ञेय गुन्हा (NCR) गुन्हा दाखल केला आहे.